'भज सेवायाम' असे प्रसिद्ध वचन आहे. सेवा करणे हेच सर्वश्रेष्ठ भजन होय. कोणतीही व्यक्ती जन्माने श्रेष्ठ ठरत नाही. सौंदर्य, धन, दौलत, शक्ती या माध्यमातून व्यक्तीला श्रेष्ठत्व येत नाही. मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते ते त्यांनी केलेल्या सेवाकार्यामुळेच. एखादी सेवा बारा वर्षे केली की एक 'तप' झाले असे म्हणतात. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या भाईंनी आज जवळपास तीन तपे पूर्ण झाली. त्यांच्या या सेवाकार्याचा गौरव विविध स्तरांवर विविध संस्थांनी केला.
- सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्यातर्फे ६ जानेवारी २००४ रोजी 'समाजभूषण' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- पंचशील जनसेवा संघ, मुंबई यांच्या वतीने सन २००६ साली सहकारातील उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल 'महात्मा जोतीराव फुले पुरस्कारा'ने मा. भाईंना गौरवण्यात आले.
- पत्रकार आणि समाजहितार्थ कार्यरत महाराष्ट्र जर्नालिस्ट फेडरेशन, पुणे यांच्या एम.जे.एफ. अॅवार्ड सोहळ्यात 'आदर्श लोकसेवक' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने २०१६ मध्ये 'सहकार रत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट, श्री क्षेत्र विठ्ठलवाडी पिंपळगाव सिद्धनाथ ता. जुन्नर, जि. पुणे यांच्या विद्यमाने वारकरी पंथातील थोर सत्पुरुष वै. ह.भ.प. गुरुवर्य कोंडाजीबाबा डेरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'वै. कोंडाजीबाबा डेरे वारकरी सेवागौरव पुरस्कार' हा वारकरी संप्रदायातील मानाचा पुरस्कार मा. भाईंना प्रदान करून वारकरी संप्रदायाने त्यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.
- सातारा उद्योग समूह आणि महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ यांच्या वतीने अहमदनगर येथे 'सह्याद्री अर्थरत्न' हा बहुमोल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- रोटरी क्लब ऑफ सातारा यांच्या विद्यमाने समाजसेवेतील उत्कृष्ट सहयोगाबद्दल २०१७ चा 'रोटरी सेवा पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
प्रसिद्धी पराङ्मुखता हा भाईंचा एक गुण मोठा आहे. प्रसिद्धीपासून भाई कायम दूर राहतात. पूज्यता डोळा न देखावी। स्वकीर्ती कानी नायकावी।। ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीची शिकवण त्यांच्या कानामनात गुंजत आहे. तरीही जनमानसातील प्रेमभाव आणि यातून तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने मा. भाईंनी हे सारे पुरस्कार आदरभावाने स्वीकारले. या स्वीकारण्यातही त्यांची विनयसंपन्नता निश्चितच कौतुकास्पद आहे.
सहकार रत्न पुरस्कार स्विकारताना मा. भाई
सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार स्विकारताना मा. भाई