श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे (भाई )
सामाजिक बांधिलकी
:
:
:
रावसाहेब वांगडे मास्तर चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई
शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्था, मुंबई
शिवसहयाद्री सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय
शिवसहयाद्री मजूर सहकारी संस्था मर्यादित
परम मर्यादित को.-ऑप. सोसायटी लि
शिवसहयाद्री रूग्णसेवा शिवसहयाद्री सहकार प्रष{क्षण केंद्र
शिवसहयाद्री इंग्लिश मिडीयम स्कूल. सातारा,गजवडी
शिवसहयाद्री वधू-वर सूचक केंद्र
:
:
मानवाचे आयुर्मान साधारण शंभर वर्षाचे मानले आहे. या मानवी जीवनाला एक शिस्त असावी, ते आनंदित राहावे, याकरिता आपल्या शास्त्रज्ञांनी याची चार भागात विभागणी केली आहे. त्याला चातुर्विध आश्रम व्यवस्था असे म्हणतात. यात एकूण चार आश्रम सांगितले आहेत. शंभर वर्षाची विभागणी २५-२५ वर्षात केली आहे. वय वर्षे ० ते २५ ब्रह्मचारी आश्रम, २५ ते ५० गृहस्थाश्रम, ५० ते ७५ वानप्रस्थाश्रम आणि ७५ च्या पुढे संन्यासाश्रम. ब्रह्मचारी आश्रमात अध्ययन सांगितले आहे. गृहस्थाश्रमात सुंदर असा प्रपंच करावा. वानप्रस्थी झाल्यावर ईशचिंतनात काळ घालवावा. संन्याशाश्रमात सर्वसंगपरित्याग करावा. अशी ही आश्रम व्यवस्था आहे. त्यातही सर्वश्रेष्ठ असा 'गृहस्थाश्रम' मानला आहे. याचे कारण बाकीचे तीनही आश्रम 'गृहस्थाश्रमा'वर अवलंबून आहेत. गृहस्थाश्रम हा बाकीच्या तीन आश्रमांचे पालन-पोषण करतो. यास्तव 'धन्यो गृहस्थाश्रमः' असे म्हटले आहे.
अशा गृहस्थाश्रमात वयाच्या २५ व्या वर्षी मा. भाईंनी पदार्पण केले. लुमणेखोल गावातील माने घराण्यातील श्री. तुकाराम लक्ष्मण माने यांची सुकन्या चि. सौ. कां. सुनंदा हिच्याबरोबर भाईंचा विवाह ठरला. १५-५-१९८१ रोजी भाई विवाहबद्ध झाले. माने घराण्यातील सुनंदा या वांगडे घराण्यात कुलवधू बनून आल्या. भाईंचा संसार सुरू झाला.
आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेक ।।
येथे आळस करू नका। विवेकी हो।। ही समर्थांची शिकवण मनी-मानसी धरून भाई संसाररत झाले. अत्यंत नेटका संसार केला. प्रपंचात धर्मपत्नीची समर्थ साथ आवश्यक असते. त्या ।। धन्यो गृहस्थाश्रमः ।। काळी खेडोपाडी शिक्षणाची सोय नसल्याने सुनंदा वहिनींचे फक्त सातवीपर्यंत शिक्षण झाले. पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार ज्ञान यात खूप अंतर असते. वहिनींचे शिक्षण कमी असले तरी त्यांनी भाईंना साथ दिली. यशस्वी पुरुषाच्या मागे एक समर्थ स्त्री उभी असते, या सुभाषिताप्रमाणे आमच्या भाईंच्या मागे आमची वहिनी खंबीरपणाने उभी आहे. शिस्तप्रिय असणाऱ्या आमच्या आईच्या हाताखाली वहिनींचा प्रपंच नेटका झाला. मुंबईची खोली लहान असल्याने आणि गावी शेतीचा व्याप असल्याने भाई मुंबईला असत, मात्र वहिनींनी मुंबईला राहण्याचा मोह आवरला. त्यांनी केलेला त्याग खूप मोठा आहे. त्या भाईंच्या मागे फक्त सप्तपदी चालल्या नाहीत, तर विवाहाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत भाईंच्या प्रत्येक पावलाला त्यांनी समर्थ साथ दिली. त्यांच्या या कर्तृत्वसंपन्न जीवनाचा गौरव म्हणून आज त्या शिवसह्याद्री परिवाराच्या 'माई' म्हणून ओळखल्या जातात. भाई आणि माई यांचा संसार अगदी सहजगत्या झाला. संसारवेलीवर तीन फुले उमलली. २९-११-१९८३ रोजी भाईना कन्यारत्नाचा लाभ झाला. तिचे शीतल असे नामकरण करण्यात आले.
द्वितीय कन्या दीपाली हिचा जन्म ६-१०-१९८६ साली झाला. आणि सन ६-१- १९८९ रोजी मा. भाईंना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याचे 'रोहित' असे नामकरण करण्यात आले. सहकार आणि संसार अशी भाईंच्या जीवनरथाची चाके झाली. सहकाराचे चाक भाईंनी चालविले, तर संसाराचे चाक समर्थपणे माईंनी सावरले. तीनही मुलांचे संगोपन, शिक्षण यथासांग पार पडले. तीनही मुले उच्चविद्याविभूषित झाली. भाईंची ज्येष्ठ कन्या शीतल हिचा विवाह सावली येथील साळुंखे घराण्यातील मा. श्री. मोहनराव यांच्याशी संपन्न झाला. द्वितीय कन्या दीपाली हिचा विवाह वेणेखोल येथील सपकाळ घराण्यातील मा.श्री. विनोदराव यांच्याशी झाला. आणि अगदी अलीकडे चि. रोहित याचा विवाह कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे गावातील कदम घराण्यातील चि. सौ. का. धन्वतरी हिच्याबरोबर संपन्न झाला. सुदैवाने उच्चविद्याविभूषित अशी पत्नी चि. रोहित यास प्राप्त झाली, स्वतः रोहित बी.ई. एम.ई. असून आज 'ज्ञानश्री'चा सारा कारभार पाहात आहे. ।। धन्यो ग्रहस्थाश्रमः ।। 'माझ्या वडिलांची मिराशी गा देवा' या संतवचनाची आठवण यावी अशा पद्धतीने आपल्या वडिलांनी आरमलेल्या ज्ञानयज्ञात आपले अपूर्व योगदान दिले आहे.
आजवर जी म्हणून कर्तबगार माणसे झाली, ही चार भांड्यांच्या, सुप, टोपल्यांच्या संसारात अकडली नाहीत. त्यांनी प्रपंच केला नाही. त्यांचा प्रपंच सहजगत्या झाला. 'अवघाचि संसार सुखाचा करीन' या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनातील संसार हा शब्द खूप मोठा अर्थ सांगणारा आहे. 'आनंदाचे आवरू मांडू जगा' एवढा तो मोठा आहे. संताच्या चरणाचा आश्रय करीत भाईंनी आपला संसार नेटका केला. कर्तव्यदक्ष पुरुषाला शोभेल असा नेटका प्रपंच केला आणि विवेकी दृष्टीने शिवसह्याद्री पतसंस्थेच्या माध्यमातून परळी खोऱ्यातील अनेक युवकांना हाताशी धरून त्यांना सतपथगामी केले. त्यांच्या संसाराची घडी सुरळीत केली. आज हजारो कुटुंबांचे आधार भाई झालेले आहेत. त्यांचा संसार व्यापक झाला आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार केला तर आज वानप्रस्थी जीवन जगत असताना 'जेवी जळा आत पद्मपत्र' या न्यायाने भाई संसारात असून पद्मपत्राप्रमाणे अलिप्त आहेत. म्हणून एवढे म्हणता येईल 'धन्यो गृहस्थाश्रमः'
सदगुरुसारिखा असता पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ।।
परमपूज्य गुरुवर्य बाबामहाराज सातारकर
मा. भाईंचे प्रेरणास्थान
ती. कै. रावसाहेब वांगडे मास्तर (आबा) यांचा अर्धपुतळा
मुंबईचे तत्कालीन महापौर व सहकार महर्षी बाबुरावजी शेटे साहेब
।। पितृदेवा भव: ।।
ती. कै बापूसाहेब रा. वांगडे
।। मातृदेवो भव: ।।
प. पू. मातोश्री गिरिजाबाई बापूसाहेब वांगडे
।। बंधुप्रेम ।।
दादा आणि भाई
समर्थ साथ धर्मपत्नी सौ. सुनंदाताई ( माई ) यांच्यासमवेत. ( भाई आणि माई
आपल्या नातवंडासह आदरणीय दादा, मा. भाई आणि सौ. माई
मा. भाई आणि माई रोहित व रवी यांच्यासोबत. ६०व्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी.
समस्त वांगडे परिवार आणि आप्तेष्ट
बालपण आणि शिक्षण
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि उरमोडी नदीच्या तीरावर असणारे आमचे नित्रळ गाव अगदी अलीकडच्या काळापर्यंत सर्वसामान्य सुविधांपासून वंचितच होते. एस.टी. देखील परळीपर्यंत येत असे. परळीपासून नित्रळपर्यंत १०-१२ किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागे. पावसाळ्याचे चार महिने तर विचारण्याची सोय नाही. सर्व गावाचा जनसंपर्क तुटलेला असायचा. शेतकरी वर्ग असणारा गावकरी पावसाच्या अगोदर चार महिन्याची तेला-मिठापासूनची व्यवस्था करून ठेवायचा. कोकण वर्गातील गाव असल्यामुळे पाऊसही प्रचंड असायचा. मात्र या प्रतिकूल वातावरणातही सारा गाव आनंदी असायचा. त्या काळात असणारे गाव पातळीवरील सांधिक बळ वाखाणण्याजोगे होते. माझा जन्म मुंबईत झाला आणि शिक्षण देखील मुंबईतच झाले. मात्र माझे बंधू मा. भाई यांचा जन्म नित्रळला झाला आणि बालपणही नित्रळलाच खेळण्या बागडण्यात गेले. मुंबईपेक्षा खेड्यातील बालपण फार आनंदी असते असे म्हणतात. तो आनंद भाईंनी उपभोगला. एक गोष्ट मात्र नक्की की, अशा दुर्गम भागातील खेड्यात शिक्षणाची समस्या मोठी होती. आमच्या गावची रचना दोन आळीमध्ये विभागली होती. वरची आळी आणि खालची आळी असे दोन भाग होते. या दोन आळ्यांमध्येच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. जिथे दळण-वळणाची साधनेच नव्हती. त्यामुळे परगावच्या शिक्षकाला येणे दुरापास्त होते. नित्रळ शेजारच्या ताकवली, निगुडमाळ, केळवली, रेवली, कातवली खुर्द आणि बुद्रुक, सांडवली या गावातून जेमतेम पट भरेल एवढे विद्यार्थी शाळेत जमत. परगावचा शिक्षक उपलब्ध नसल्याने गावातील बबन गुरुजीच मुलांना शिकवत असत. अशी ती एकशिक्षकी शाळा होती. या शाळेत मा. भाईंचे तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळा आमच्या घराला लागूनच होती. गुरुर्जीचे घरही आमच्या घराशेजारीच बालपण आणि शिक्षण होते.
सर्व मित्र डबे घेऊन मधल्या सुट्टीत आमच्याच घरी जेवायला येत असत. त्या काळी मुलांच्या शिक्षणाची किती तारांबळ होती, याचे वर्णन केले तर आज शिक्षणाची सुविधा सहस्त्रपटींनी सुधारली आहे. त्या वेळी दप्तर नसे. लहान गोणीत पाटी, पुस्तक, पेन्सील, डबा घेऊन ही लहान गोणी पाठीवर मारायची आणि शाळा गाठायची. जवळपास ८० टक्के मुलांच्या पायात चप्पल नसायचीच. अनवाणी जावे लागे. शाळेत गेल्यावर पाटी पुस्तक काढून घ्यायचे आणि तीच गोणी (दप्तर) खाली बसायला बसकर म्हणून घ्यायचे. आज हे सांगताना डोळ्याच्या पापण्या ओल्या होतात. पण तो आनंद आणि थाट काही औरच होता हे मात्र निश्चित. सर्वात मौज शनिवारी असायची. शाळेतल्या सर्व मुला-मुलींना बबन गुरुजी घरून येताना गाईचे शेण घेऊन यायला लावत. अर्धा दिवस शाळा झाली की, डबा खायचा आणि मग सर्व मुला-मुलींनी मिळून त्या शेणाने आपल्या शाळेच्या खोल्या सारवून घ्यायच्या. काय तो काळ होता? आजच्या काळात असे शिक्षण आजची पिढी घेईल का? हा प्रश्न मनात डोकावल्याशिवाय राहणार नाही.
उन्हाळ्याच्या सुट्टीत अशोक मा. वागडे, हणमंत वागडे, राम चिकणे हे मित्र घरच्या म्हशी रानात घेऊन जाणे, म्हशी चरून झाल्या की, दुपारच्या वेळात म्हशी धुणे, नदीवर करंजाडोह, देऊळडोह यात मनसोक्त पोहणे, शाळा सुटल्यावर विटी-दांडू, लगोन्या, चकोऱ्या या मैदानी खेळांत रमून जाणे, अशा स्वरूपाचे बालपण भाईंच्या वाट्याला आले. तिसरीपर्यंतचे शिक्षण पार पडले. ही आनंदाची वर्षे कशी निघून गेली हे कळलेच नाही. ती. अण्णांनी माईना पुढील शिक्षणाकरिता मुंबईला आणले. त्या वेळी ती. आबा, आजी आणि अण्णा मुंबईला गिरगावात खेतवाडीत अतुल निवासमध्ये पहिल्या मजल्यावर राहात होते. १० बाय १०ची ती खोली होती. त्या काळी खेतवाडी, कुंभारवाडा या भागात आमच्या परळी खोऱ्यातील गावांचे गाळे होते. गावाकडील कामगार या गाळ्यातच राहात होते. अण्णांनी भाईच्या पुढील शिक्षणासाठी खेतवाडीमधील महानगरपालिकेच्या शाळेत ४थीकरिता नाव नोंदवले. चौथी इयत्ता भाई उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेः या शाळेत माईंना बालपण आणि शिक्षण चंद्रकांत भानसे आणि बाळा खडागळे हे दोन जीवलग मित्र भेटले. त्यांच्या मैत्रीचा वीण अत्यंत घट्ट होता.
माझे आजोबा आबा म्हणजे रावसाहेब वांगडे मास्तर यानी भाईंना माध्यमिक शिक्षणाकरिता नानूभाई देसाई रोडवर म्हणजे पानबाजारातील विल्यम हायस्कूलमध्ये दाखल केले. ख्रिस्ती मिशनरी हायस्कूल असल्याने कडक शिस्त होती. माईंना हे सारे नवीन होते. गावाकडची मजा, मित्र सारे सारे इथे नव्हते, पण या ठिकाणी भालचंद्र जाधव, शिवराम मोरे, हेमंत कारंडे, श्रीपाद जोशी, यहके अशा सर्व जातिधर्माच्या मुलाबरोबर मैत्री झाली. उच-नीच हा भेद त्याच वेळी मावळून गेला. कमलाकर वाळके सर, त्रिभुवन मॅडम, सामंत सर, बुंदेल सर, गोलतकर या शिक्षकांच्या आठवणी आजही भाई कौतुकाने सांगत असतात.
मा. भाईंचे शिक्षण चालूच होते. मात्र ती. आबा आणि आजी यांचे वय झालेले असल्याने त्यांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी नित्रळला प्रस्थान ठेवले. आता अण्णा आणि भाई हे दोघेच मुंबईत राहिले. हा कालखंड मात्र फार अडचणीचा होता. कमवते एकटे अण्णाच होते. मुंबई आणि गावचा खर्च याचा ताळमेळ राखावा लागे. मात्र अण्णांचा स्वभाव हिशेबी होता. त्यांनी हा कारभार उत्तम रीतीने हाताळला. रोजच्या खर्चाचे टिपण करणे ही त्यांची चांगली सवय होती. त्यांच्या जमा-खर्चाची डायरी आजही मा. भाईंनी जपून ठेवली आहे. अण्णांमुळेच भाईंना जमा-खर्च टिपून ठेवण्याची चांगली सवय लागली. आजही ते रोजच्या रोज जमा-खर्च लिहितात. नवीन पिढीने हा आदर्श समोर ठेवला पाहिजे. याच कालखंडात भाईंनी शरीर कमावले. व्यायामाची आवड होती. आमचे शेजारी भीमराव पवार यांच्या ओळखीने गिरगाव कोर्टाच्या मागे एक फेमस जीम होती, त्यात प्रवेश मिळाला. तो देखील मोफत. भाई आणि त्यांचा मित्र भालचंद्र हे दोघे जण नेटाने व्यायाम करीत होते. शाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होती. सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा आणि शाळेत जावे. व्यायामाने भूक लागायची. मग एक दुधाची बाटली आणि खेतवाडी पाचव्या गल्लीतील इराण्याच्या दुकानातून एक पावाची लादी आणायची. ती बालपण आणि शिक्षण फस्त करायची. मग शाळा गाठायची. संध्याकाळी शाळा सुटल्यावर खेतवाडी ७व्या गल्लीत पाटणमधील सोनवडी गावची तालीम होती, त्या तालमीत कुस्तीचे डाव शिकायचे. अशा रीतीने बालपणात भाईंनी शालेय शिक्षण तर घेतलेच, पण कष्टाने व्यायाम करून शरीर संपदाही कमावली. आज वयाच्या साठीमध्ये एखाद्या तरुणालाही लाजवेल, इतक्या तडफेने हे न थकता कार्यरत असतात, याची बीजे या शरीरसौष्ठवात सामावली आहेत.
या शालेय शिक्षणाच्या कालखंडात दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी गावीच मौजमजेत जायची. मुंबईहून भाई गावी यायचे. आम्ही सारी भावंडे आणि गावातील मुले दिवाळीचा किल्ला करण्यात मग्न होत असू, दगडी गोळा करणे, लाल चिकणमाती आणणे, त्यापासून आपल्याला जमेल असा किल्ला तयार करणे, त्यावर धान्य पेरणे, मावळे मांडणे, असे उद्योग चालू असत. याच कालखंडात भुईमुगाच्या शेंगा काढायचे काम असे. त्या ओल्या शेंगा कराळ्यावर भाजून खाण्याचा आनंद अवर्णनीय म्हणावा लागेल.
उन्हाळ्याच्या सुट्टीत कुलदैवत श्री केदारनाथ याच्याकरिता येणारी सारी नाटक कंपनीची माणसे, नेते मंडळी ती. आबांच्या सलोख्याने आमच्याच घरी उतरत असत. ९ खणाचे मले थोरले घर माणसांच्या वर्दळीने आणि मुलाच्या किलबिलीने भारावून जायचे. जेवणाच्या पंगती उठायच्या. देवाची फार मोठी यात्रा, पालखी सोहळा, देवाचा छबिया या साऱ्यांनी गाव दुमदुमलेला असायचा. दुसऱ्या दिवसाच्या फूट यात्रेची मजा त्यापेक्षा न्यारी असायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे, विष्णुबाळाचे पोवाडे यांनी तरुणांच्या अंगात जणू काही वीरश्री सचारत असे. रात्री भुत्याचे कार्यक्रम आम्ही मुले आवर्जून पाहात असायचो. आबांच्या राजकारणाच्या प्रभावामुळे या प्रसंगी सातारा जिल्ह्यातील मोठमोठी नेते मंडळी घरी येत असत. या साऱ्या घटनांचे अतिशय चांगले संस्कार भाईंच्या बालमनावर झाले. त्यातून त्यांचे जीवन उज्वल होत गेले. उन्हाळ्याची सुट्टी संपली की, भाईंना मुबईला जाणे जीवावर येई. गावातून पाय निघत नसे, महिना दीड महिना खेळात रमलेला जीव पुन्हा मुबईकडे ओढत नसे. त्यातून या सुट्टीत आईचे मिळालेले प्रेम भाईंना बांधून ठेवत असे. परंतु बालपण आणि शिक्षण नाइलाजाने मुंबईला निघावे लागे. आई फराळाचे डबे करीत असे. लाडू, चिवडा, शंकरपाळी, कीटकडबुळी असे पदार्थ त्यात असत. भाईंच्या हातात ती पिशवी देऊन म्हणायची, 'शाळेत जाताना यातला फराळ करीत जा. तेवढाच पोटाला आधार असे म्हणताना तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळत असत. माईंचा चेहरा रडवेला होत असे. हे मायेचे दृश्य बघून माझ्याही डोळ्यातील गंगाजमुना वाहत असत. भाईंना हे मायेचे बंध तोडून मुंबईला जावे लागायचे.
माईचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होत आले. ११वीची परीक्षा पास झाल्याचे अण्णानी पत्रानेच माईना गावी कळविले. उन्हाळ्याच्या सुट्टीतून मुबईला जायला उशीर झाला. चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळणे कठीण झाले. वर्ष वाया जाऊ नये म्हणून भाईंनी महाराष्ट्र कॉलेजला प्रवेश घेतला, 'कमवा आणि शिका' हे कर्मवीर भाऊराव पाटलाचे ब्रीदवाक्य भाईनी उराशी बाळगले. अर्धवेळ नोकरी करता यावी म्हणून सकाळी कॉलेज केले. दुपारी अर्थार्जन केले. दुसऱ्या वर्षी मात्र चौपाटी येथील भवन्स कॉलेजला प्रवेश मिळविला आणि याच कॉलेजमधून कला शाखेची पदवी प्राप्त केली. हे कॉलेजचे शिक्षण चालू असताना भाईनी मोटर गॅरेजमध्ये काम केले. इम्पिरियल सिनेमासमोर मराठे रेडिओ या कंपनीत रेडिओ दुरुस्तीचा कोर्स देखील केला. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर श्रमिक बैंकेत दैनिक प्रतिनिधीचे काम मिळविण्यासाठी अर्ज केला, पण यश आले नाही.
माझगाव डॉकमध्ये नोकरीसाठी केलेला प्रयत्नही वाया गेला. काहीतरी हाताला काम पाहिजे म्हणून टेम्पो आणि टॅक्सीचाही व्यवसाय केला, मात्र त्यातही माईंना फारसे यश आले नाही. कदाचित या अपयशामागे भगवंताची एक भव्य योजना उभी होती. कित्येक वेळा भाई मरिन्स लाईनच्या समुद्रकाठी निळ्याशार समुद्राच्या घोंगावणाऱ्या लाटांकडे शून्यात नजर लावून बसले असायचे. मनात एक विचार आला, आपला घरचा व्यवसाय आपण सांभाळावा. ती. अण्णांचे एक हॉटेल होते आणि पिठाची गिरणी होती. या दोन्ही व्यवसायात भाईंनी लक घाताले. व्यवसाय सुरू झाला. आर्थिक उलाढालीकरिता भाईंनी सातारा बँकेच्या कुंभारवाडा शाखेत खाते काढले. याच माध्यमातून भाईंची भेट स्व. बाबुरावजी शेटे याच्याशी झाली आणि भाईच्या सहकार क्षेत्राची पहाट फुटली.